वार्ताहर/ आंबोली
रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील कोंडेतर्फे सौंदळे येथे हवेत गोळीबार करून पसार झालेल्या तीन इसमांना आंबोली पोलीसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतले . हया बाबतचा बिनतारी संदेश रत्नागिरी नियंत्रण कक्ष यांच्या कडून सिंधुदूर्ग नियंत्रण कक्ष यांना दि. ०६/०९/२३ रोजी पहाटे साडे तीन वाजता प्राप्त झाला. त्या नुसार नाकाबंदी करून हया संशयीत आरोपींना पकडण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि. ०६ रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास मा . नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग इथून कळविले की रत्नागिरी नियंत्रण कक्ष यांचेकडून बिनतारी संदेश आधारे प्राप्त झालेल्या माहितीवरून स्विफ्ट गाडी नंबर MH14 -JA -4155 हे वाहन आणि पांढऱ्या रंगाची ‘ फॉर्च्युनर गाडी नंबर 9090 (पूर्ण नंबर माहित नाही )या दोन गाडीतील इसमांनी कोंडे तर्फे सौंदळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे हवेत गोळीबार करून सिंधुदुर्गच्या दिशेने निघून गेलेले आहेत तरी तात्काळ नाकाबंदी करून गाडी मिळून आल्यास नियंत्रण कक्ष येथे कळवावे . आंबोली पोलीसांनी पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करून हवालदार दिपक शिंदे , पोलीस नाईक मनिष शिंदे ,होमगार्ड चंद्रकांत जंगले हे सर्व वाहनांची कसून चौकशी करून वाहनांची तपासणी करत असताना सकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीच्या दिशेने लाल रंगाची स्विफ्ट गाडी येताना दिसून आली असता सदर गाडी थांबून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीचा नंबर हा MH14 -JA -4155 प्रमाणेच होता .तसेच वाहनांमध्ये एकूण तीन इसम प्रवास करीत होते . त्यांच्या नावा गावाची खात्री केली असता चालक प्रवीण परमेश्वर पवार व २५ रा.तांबडे ता . मोहोळ जि. सोलापूर, शेखर नेताजी भोसले वय २५ वर्षे रा . खवणे ता. मोहोळ जि . सोलापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









