ऑपरेशन सिंदूर राबवित भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. एका रात्रीत नऊ ठिकाणी हल्ले करीत 100 हून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र सीमेवर दहशतवादी आणि त्यांचा आका असलेल्या पाकिस्तानचे कंबरडे मोडलेले असतानाच त्यांचा कळवळा असलेल्या काही घरभेद्यांना मिरची लागली आहे. यामुळे देशात राहुन देशाबरोबर गद्दारी करणाऱ्या अशा घरभेद्यांच्या नांग्या ठेचण्याची हीच योग्य वेळ आहे.
पाकिस्तानने पोसलेल्या नराधमांनी काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध नागरिकांच्या रक्ताचा अक्षरश: सडा पाडला. धर्म विचाऊन या नागरिकांना भरदिवसा गोळ्या घालुन ठार मारले. अक्षरश: आई, पत्नी, मुले यांच्यासमोर त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. कुणाचे सिंदूर (कुंकु), तर कुणाचे वडीलांचे छत्र तर कोण्या माईच्या लालवर अंधाधुंद गोळीबार करीत त्यांच्या शरीराची अक्षरश: चाळण केली. 26 नागरिकांचा जीव घेऊन शांत झालेल्या या दहशतवाद्यांनी येथून पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. काय चुक होती या निरपराध्यांची जे त्यांना धर्म विचाऊन त्यांचे खून पाडण्यात आले. या घटनेमुळे सौदी येथे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी तत्काळ दौरा अर्धवट सोडत देश गाठला. जिथे देशवासीयांवर हल्ला होत असेल तिथे शांत बसणारे हे पंतप्रधान कुठले. यापूर्वीही त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. यावेळी तत्काळ अनेक योजना आखत अखेर पंधरा दिवसांनी त्यांनी सिंदूर पुसणाऱ्या आपल्या आई-बहिणींना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची मोहीम आखली. एका रात्रीत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ले करीत जवळपास 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आपल्या आई-बहिणींना या पंतप्रधानांनी न्याय मिळवून दिला. भारताच्या तिन्ही दलांनी सीमेवर आणि सीमेबाहेर जोरदार कारवाया करीत देशाचे संरक्षण सुऊ ठेवले आहे. मात्र देशांतर्गत असलेल्या घरभेद्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच या घरभेद्यांच्या नांग्या ठेचण्याची हीच खरी वेळ आहे.
यासाठी देशातील तपास यंत्रणांनी तत्काळ पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. सीमेवर पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी जरी केली असली तरी त्यांची आगळीक सुऊच आहे. मात्र याला भारतीय संरक्षण दले सडेतोड उत्तर देत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचा पुळका असलेली काही पिलावळ अद्यापही त्यांचा चांद सितारा मिरवित सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याचे आढळून येत आहे. अशा घरभेद्यांना आता कोणतीही दया-माया दाखविण्याची आवश्यकता नसल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. देशापुढे कोणीही मोठा नाही. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सातत्याने देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आहे. कारण मुंबईवर हल्ला म्हणजेच संपूर्ण देशावर हल्ला याची जाणिव या दहशतवाद्यांना आहे. तर मुंबई शहरात जगातील अनेक देशांची दुतावासे देखील आहेत. यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत नेमके काय सुऊ आहे ? यासाठी पाकिस्तानच्या अनेक पिलावळी या ठिकाणी मोकाट सुटल्या आहेत. यापूर्वी भारत सरकार तसेच राज्य सरकारने सीमी या पाकिस्तानच्या स्लिपर सेल संघटनेवर बंदी घातली आहे. मात्र अद्यापही सीमीचे हस्तक तसेच काही पाकिस्तानी नागरिक तर पाकिस्तानच्या इंटर सर्व्हीस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संघटनेसाठी काम करणाऱ्यांची यादी कमी नाही. अशा अनेकांवर यापूर्वी मुंबई पोलीस, राज्य एटीएस आणि देशातील इतर तपास यंत्रणांनी कारवाया केल्या आहेत. त्यातूनही काही घरभेदी अद्यापही पांढरपेशा बुरख्याच्या आडून पाकिस्तानला मदत करीत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या संदर्भात अलीकडील काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसजवळ संशयास्पदपणे फिरताना 65 वर्षीय नादिर मुनीर खान याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे वैध व्हिसा किंवा ओळखपत्र नव्हते. त्याला परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यानुसार दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. ऑक्टोबर 2024 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर, तो अजूनही भारतात बेकायदेशीर असल्यामुळे, त्याला दक्षिण मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. मात्र तो नेमका मुंबईत काय करत होता? हे अद्यापही समोर आले नाही. तसेच मे 2025 मध्ये, नवी मुंबई पोलिसांनी तीन पाकिस्तानी नागरिकांना त्यांचा व्हिसा रद्द केल्यानंतर हकालपट्टी केली. हे सर्व अल्पकालीन व्हिसावर भारतात आले होते.
राज्य सरकारने अशा सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या व्हिसाच्या कालावधीत भारत सोडण्याचे आदेश दिले होते. तर अलीकडेच, मुंबई पोलिसांनी 15 पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर हकालपट्टी केली. त्यांच्याविऊद्ध कोणतीही गुन्हेगारी कारवाई न करता, त्यांना थेट त्यांच्या देशात पाठवण्यात आले. महाराष्ट्रात, विशेषत: मुंबई आणि नवी मुंबईत, अवैधरित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांविऊद्ध पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर किंवा बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर, अशा नागरिकांना अटक करून हकालपट्टी केली जात आहे. या कारवायांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळत आहे. मात्र व्हिसा संपल्यानंतर देखील हे पाकिस्तानी नागरिक देश का सोडत नाहीत. नेमके कोणत्या उद्देशाने ही पिलावळ देशात थांबत आहे, याचा तपास करणे आवश्यक आहे.
कारण, मुंबईत पाकिस्तानी गुप्तहेरगिरीशी संबंधित अलीकडील काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी नक्कीच घरभेद्याना ]िवविध अमिषे दाखवित त्यांचा वापर करण्यास सुऊवात केल्याचा संशय आहे. कारण यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. डिसेंबर 2023 साली गौरव पाटील या तरूणाला पोलिसांनी अटक केली होती. गौरव पाटील हा मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये प्रशिक्षणार्थी होता. गौरव पाटीलने फेसबुक आणि
व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गोपनीय माहिती पाठविली होती. यावेळी त्याने जहाजांची नावे, छायाचित्रे आणि सध्या ते कुठे आहेत त्यांची ठिकाणे यांसारखी माहिती दिली होती. यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. तर मार्च 2024 साली माझगाव
डॉकयार्डमध्ये स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर असलेल्या कल्पेश बैकर याला अटक करण्यात आली होती. त्याने एका पाकिस्तानी महिला एजंटला संवेदनशील माहिती दिली होती. कल्पेश हा हनिट्रॅपचा बळी होता. तसेच 2018 साली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी असलेल्या अझर रफीक याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला होता. यावेळी त्याला मदत करणाऱ्या तीन भारतीय घरभेद्यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्याचप्रमाणे, जुलै 2023 साली राज्य एटीएसने अर्मान अली सय्यद (65) आणि मोहम्मद सलमान सिद्दीकी (24) यांना अटक केली होती. हे दोघे आयएसआयसाठी हेरगिरी करीत होते. तर डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुऊलकर प्रकरण तर सर्वांना ज्ञात असेलच. निवृत्तीच्या वयात म्हातार चळ भरलेल्या या शास्त्रज्ञाने सर्व लाज सोडत पाकिस्तानी ललनेच्या प्रेमापोटी संवेदनशील माहिती पुरविली होती.
हे केवळ पकडलेले घरभेदी आहेत. मात्र अद्यापही काही घरभेदी मोकाट असून, त्यांच्या नांग्या लवकरात लवकर ठेचाव्यात. जेणेकऊन पुन्हा कोणी देशाशी गद्दारी करण्याची हिम्मत करणार नाही.
– अमोल राऊत








