न्हावेली / वार्ताहर
The thirtieth monthly program of Ajgaon Sahitya Katta on 16th!
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा तिसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा विषय ‘कथा शिंपल्यातील मोती’ असा असून प्रमुख वक्ते मोतिराम टोपले सर आहेत. श्री. टोपले सर हे माजगाव, सावंतवाडी येथील असून तेथील हायस्कूलचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी अनेक एकांकिका, कथा लिहिल्या असून अलिकडेच त्यांचा ‘उपचार माणुसकीचा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. या कार्यक्रमात ते आपल्या कथेविषयी बोलणार आहेत. तसेच एखादी कथाही सादर करणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि सरांचा लेखन प्रवास जाणून घेणेसाठी सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.









