वृत्तसंस्था / ग्रेटर नोएडा
अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. या कसोटीच्या पहिल्या दोन दिवशीही खेळ होऊ शकला नव्हता. ओलसर मैदान, स्टेडियमची अपुरी तयारी याबद्दलही शंका उपस्थित झाल्या होत्या. मुसळधार पावसामुळे आजचा खेळ रद्द करण्यात आला असून वातावरण स्वच्छ झाल्यास आज गुरुवारपासून सामना सुरू करण्यात येईल आणि दिवसात 98 षटकांचा खेळ घेण्यात येईल, असे अफगाण क्रिकेट मंडळाने सांगितले. अफगाणला अव्वल संघांविरुद्ध खेळण्याची फार कमी संधी मिळते. ते या कसोटीचे यजमान आहेत.









