गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव ता. करवीर येथील श्रीकृष्ण मंदिरातून रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने मंदिरात असलेली दानपेटी चोरून नेऊन त्यामधील पैसे काढून घेऊन ती पेटी मंदिराच्या शेजारी शेतवाडी टाकून चोर प्रसार झाल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
गोकुळ शिरगाव येथील मंदिरात नित्यनियमाने बाळासो गुरव हे पूजा करत असतात. सोमवारी सकाळी ते पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना दानपेटीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब गोकुळ शिरगाव चे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे यांना कळवले. सरपंचांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलीसही घटनास्थळी हजर झाले. दानपेटी मध्ये फारसे पैसे नसल्याचे सरपंच डावरे यांनी यावेळी सांगितले .









