मुंबई : आगामी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवल्याने सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक नव्हता. शिवसेनेतील ठाकरे गटाला धनुष्य़बाण हे चिन्ह न मिळाल्याने त्याचा अर्थ असा होत नाही की, उद्धव ठाकरे यांच्या नेर्तृत्वाखालील गट कमकुवत किंवा निराश झाला.’ असे राष्ट्रवादी कॉंग्रसने प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेनेचे निवडणुक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. अंधेरी पुर्व मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय झाल्याने दोन्ही गटांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा निर्णय आश्चर्यकारक नाही असे म्हटले आहे. या वेळी ते म्हणाले,”एकनाथ शिंदे यांच्या नेर्तृत्वाखालील गट ही पोटनिवडणुक लढवत नाही तरीही त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी होती. आयोगाने चिन्ह गोठवल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिक कमकुवत झाले किंवा खचले असा होत नाही. शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससह भाजपला चांगली टक्कर देईल.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








