JP Nadda Tenure Extended : भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांचा कार्यकाल वाढवण्यात आला आहे. जून 2024 पर्यंत नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील अशी माहिती आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. भाजपाच्या बैठकिनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.आगामी लोकसभा निवडणुका नड्डांच्या नेतृत्वात लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना अमित शहा यांनी नड्डा यांचे कौतुक केले. कोरोना काळात नड्डांच्या मार्गदशनाखाली मोठं काम करण्यात आलं. सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वात बुथ सशक्तीकरण मोहीम राबवून ती यशस्वी करण्यात आली. एवढेच नाहीतर नड्डांच्या कार्यकाळात बिहार,हरियाणा,उत्तर प्रदेश,मणीपूर,आसाम,गोवा आणि गुजरातमध्ये भाजपने निवडणुका जिंकल्या. गोवा आणि गुजरातमध्ये नड्डांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता स्थापन केली असल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleजाणून घ्या,राखी सावंतशी लग्न करणारा आदिल दुर्रानी आहे तरी कोण?
Next Article जिथे जिथे फॅसिझम आला तेथे फॅसिझमचा पराभव झाला!









