वसन बाला यांचा ‘जिगरा’ हा चित्रपट चालू वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षिक चित्रपट मानला जातो. आता या चित्रपटाचा टीजर-ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात मनस्पर्शी अनेक दृश्ये आहेत. या चित्रपटात आलिया भट्टने वेदांग रैनाच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. भावाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या बहिणीची भूमिका आहे. जिगराच्या या ट्रेलरमध्ये आलिया भट्टच्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याचे आणि ती स्वत:ची वेदनादायी कहाणी कुणाला तरी ऐकवत असल्याचे दिसून येते. देवाने आईला नेले आणि वडिलांनी स्वत:चा जीव घेतला, दूरच्या नातेवाईकाने आश्रय दिला आणि मोठी किंमत वसूल केली. कहाणी अत्यंत मोठी असून भावाकडे अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे अशा आशयाचा संवाद तिच्या तोंडी आहे. या ट्रेलरमध्ये ‘बच्चन नहीं बनना है, बचकर निकलना है’ असा डायलॉग आहे. वेदांग साकारत असलेली व्यक्तिरेखा तुरुंगात असल्याचे आणि तेथे त्याच्यावर अत्यंत अत्याचार होत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. जिगरा हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन वसन बाला यांनी केले आहे. जिगरासोबत आलिया ही यशराज फिल्म्सच्या अॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाचे चित्रिकरण ती सुरू करणार आहे. यात ती रणवीर कपूर आणि विक्की कौशलसोबत काम करणार आहे.
Previous Articleयुक्रेनमध्ये पोहोचला भारताचा दारूगोळा
Next Article पॅलेस्टाइनच्या प्रस्तावापासून भारत राहिला दूर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









