थोड्याच दिवसात थंडी सुरु होईल. या दिवसात घरी पौष्टिक पदार्थ बनवले जातात.मग यामध्ये तिळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, डिंकाचे लाडू असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. पण अळिवाचा लाडू हा खूप पौष्टिक असतो. गरदोरपणात स्त्रीयांनाही हा लाडू आवर्जून दिला जातो. चला तर मग जाणून घेऊयात हे लाडू कसे बनवले जातात.
अळिवाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य
१ वाटी अळीव
२ नारळ
अर्धा किलो गूळ
बारीक केलेले बदाम
बारीक केलेले काजू
२ मोठे चमचे मनुके
१/२ छोटा चमचा वेलची पूड
कृती
नारळाच्या पाण्यात किंवा 1 वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवा .खोबरे खवणून घ्या.अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की बारीक केलेले काजू, बदाम (काजू बदामाची तुम्ही बारीक पूड यामध्ये वापरू शकता.) आणि वेलची पावडर घालून ढवळावे.पाण्याचा अंश आटेपर्यंत हे मिश्रण शिजवावे.गोळा झाला की गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे.आणि थंड झाल्यावर याचे गोल लाडू वळावेत.हा लाडू स्वादिष्ट तर आहेच. शिवाय अत्यंत पौष्टिक देखील आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









