हवामानात परिवर्तन झाल्यास चहाचा स्वादही भिन्न प्रकारचा होतो, असे ब्रिटनच्या संशोधकांना आढळले आहे. ‘एमी’ नावाच्या चक्रीवादळाने पाण्याचा उत्कलंन बिंदूही कमी केला आहे. त्यामुळे चहाचा स्वाद पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे या संशोधकाचे म्हणणे आहे. हे वादळ असेल, किंवा अन्य कोणते वादळ असेल, त्याच्या प्रभावक्षेत्रातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे अशा कमी दाबयुक्त हवेत पाण्याचा उत्कलन बिंदूही नेहमीच्या उत्कलन बिंदूपेक्षा कमी होतो. आपण चहा करताना प्रथम पाणी गरम करतो. ते उकळू लागले, की त्यात चहाचे चूर्ण ओततो. नेहमीच्या वातावरणात पाणी साधारण: 100 डिग्री सेल्शियस या तापमानाला उकळते. त्यामुळे चहाचा स्वाद नेहमी समान रहातो. तथापि, चक्रीवादळामुळे पाणी उकळण्याचे तापमान कमी केल्याने अशा कमी तापमानाला उकळणाऱ्या पाण्यात चहाचे चूर्ण घातले, तर चहाच्या स्वादात आणि चवीत फरक पडतो. कारण पाणी जर विशिष्ट तापमानापर्यंत उकळले नाही, तर चहाचे चूर्ण त्यात पूर्णत: मिळसत नाही, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या संशोधकांच्या का महत्वपूर्ण संशोधनाची बरीच चर्चा विज्ञान वर्तुळात आहे.
काही काळापूर्वी ब्रिटनला एमी या वादळाचा दणका बसला होता. या वादळाला ब्रिटनमधील संशोधकांनी ‘वेदर बाँब’ किंवा हवामानावर आक्रमण असे नाव दिले आहे. या वादळामुळे एकंदर हवामानात काही प्रमाणात परिवर्तन झाले असून अचानक मोठा पाऊस, ढगफुटी, अकस्मात गारवा येथ्णे आदी प्रकार होत आहेत. या वादळामुळे वातावरणाचा दाब अचानक कमी होत आहे. परिणामी, अनेक नैसर्गिक प्रक्रियांमध्येही मोठे परिवर्तन दिसून येत आहे. ही धोक्याची घंटा आहे, असे काही संशोधकांचे मत आहे. अलिकडच्या काळात चक्रीवादळांची संख्याही वाढली असल्याने वातावरणीय परिवर्तनाचे प्रमाणही मोठे असल्याचे दिसत आहे.









