सोन्याळ :
पावसाळा सुरू होताच जांभळाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक उत्सुक असतात. मात्र, यंदा गावरान जांभळाची प्रतीक्षा दुर्मिळ चालली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून जांभळाची उत्पादन क्षमता कमी होत असतानाच यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जांभळाच्या हंगामालाच मोठा फटका बसला आहे.
जतसह जिल्ह्यात गावरान जांभळाच्या झाडांना यंदा मोहर चांगला आला होता. परंतु, अवकाळीमुळे बहुतेक झाडांवरील मोहर गळून पडला. परिणामी फळधारणा होण्याआधीच नुकसान झाले. याशिवाय वातावरणातील बदल, तापमानातील चढ-उतार आणि वेळेअगोदर पडणारा पाऊस या सर्व गोष्टींनी मिळून जांभूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. एकीकडे गावरान झाडांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे नव्या लागवडीची झाडं अजून उत्पादक झालेली नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये गावरान जांभळाचा पुरवठा लक्षणीय घटला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने गावरान जांभळाची चव ‘दुर्मिळ’ होण्याची शक्यता आहे.








