प्रवीण देसाई, कोल्हापूर
राज्य सरकारकडून रोजगार हमी योजनेकरीता जिह्यासाठी 2023-24 या वर्षासाठी 3 लाख 68 हजार 737 मनुष्य दिन निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. याचे संबंधित विभागांना वाटप करावे असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, गतवर्षी जिह्यासाठी दिलेले 3 लाख 44 हजार 659 मनुष्य दिनाचे उद्दीष्ट पूर्ण होऊन ते 4 लाख 16 हजार 189 इतके झाले आहे. हे प्रमाण 120.75 टक्के इतके आहे. यावर्षीही चांगल्या पध्दतीने उद्दीष्टपुर्ती पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली जातात. गतवर्षी 3 लाख 44 हजार 659 मनुष्य दिनाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट पूर्ण कऊन जिल्हा प्रशासनाने 4 लाख 16 हजार 189 मनुष्य दिन निर्मिती केली आहे. याची टक्केवारी 120.75 इतकी आहे. यावेळी सुमारे 30 हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले. यामध्ये प्रत्येक मजुराला 248 ऊपये प्रति दिन मजुरी देण्यात आली. गतवर्षीचे उद्दीष्ट चांगल्या पध्दतीने पूर्ण केल्यामुळे यंदा जिह्यासाठी उद्दीष्ट वाढवून देण्यात आले आहे. त्यानुसार 3 लाख 68 हजार 737 मनुष्य दिनाचे उद्दीष्ट राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर तहसीलदारांना उद्दीष्टाचे वाटप कऊन पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
‘रोहयो’तून होणारी कामे
सार्वजनिक कामे : शाळा संरक्षित भिंत बांधणे, शाळा शौचालय बांधणे, पाणंद रस्ते (सर्व कामे ग्रामपंचायत विभाग, जि.प.), वृक्ष लागवड, रोपवाटीका (वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग).
वैयक्तिक कामे : सिंचन विहीर, शौचालय बांधकाम, शौचख•ा (सर्व कामे ग्रामपंचायत विभाग, जि.प.), फळबाग लागवड, नापेङ (सर्व कामे कृषी विभाग), घरकुल किटक संगोपन व तुती लागवड (रेशीम विभाग).
राज्य सरकारने जिह्यासाठी या वर्षाकरीता एकूण 3 लाख 68 हजार 737 मनुष्य दिन निर्मितीचे उद्दीष्ट दिले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर तहसीलदारांसह गटविकास अधिकारी व तालुकास्तरावरील संबंधित विभागांना उद्दीष्टासंदर्भात कळविण्यात आले आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुऊ करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
–भगवान कांबळे, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो)
‘रोहयो’ ची मनुष्य दिन निर्मितीची उद्दीष्टपूर्ती (2022-23)
तालुका उद्दीष्ट उद्दीष्टपुर्ती टक्केवारी
आजरा 19614 29094 148.33
गगनबावडा 14174 12053 85.04
भुदरगड 30450 28828 94.67
चंदगड 25812 59653 231.11
गडहिंग्लज 35241 38277 108.61
हातकणंगले 46639 41871 89.78
कागल 34676 47313 136.44
करवीर 36029 38527 106.93
पन्हाळा 28984 29802 102.82
राधानगरी 30854 51021 165.36
शाहुवाडी 20507 16908 82.45
शिरोळ 21679 22843 105.37
एकूण – 344659 416189 120.75
‘रोहयो’ चे यंदाचे मनुष्य दिन निर्मितीचे उद्दीष्ट (2022-23)
तालुका उद्दीष्ट
आजरा – 22649
गगनबावडा- 19741
भुदरगड – 33897
चंदगड – 30739
गडहिंग्लज- 34213
हातकणंगले – 41485
कागल – 34999
करवीर – 35061
पन्हाळा – 31632
राधानगरी – 32721
शाहुवाडी – 26277
शिरोळ – 25324
एकूण- 368737
Previous Articleपंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात होणार का?
Next Article राजस्थानात मिग-21 विमान घरावर कोसळलं; दोघांचा मृत्यू









