पावसाळ्यात डोंगरांवरुन कोसळणारे जलप्रवाह अत्यंत रम्य असतात. याचमुळे पावसाळी पर्यटनाचे प्रमाण अलिकडच्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु जगात एक असा सुंदर मानवनिर्मित धबधबा आहे जो एका उंच इमारतीमधून खाली कोसळतो. दिग्गज उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर या सुंदर धबधब्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. चीनमधील गुइझोउ प्रांतात हा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित धबधबा आहे. हा धबधबा तेथील लिबियन इंटरनॅशनल बिल्डिंगचा एक भाग आहे. या धबधब्यातील पाणी खाली वाहून तळघरात साठविले जाते. तेथुन हे पाणी टाकीमधून पुन्हा वर वाहून नेले जाते. 121 मीटर उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर चार महाकाय पंप वापरून पाणी धबधब्यासारखे खाली सोडले जाते. इमारत आणि या धबधब्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले, परंतु हा धबधबा केवळ सहावेळा प्रवाहित झाला आहे. याचे कारण म्हणजे याच्या उपकरणांची अत्यंत मोठी किंमत आहे. धबधब्याप्रमाणे पाणी सोडण्यासाठी पंपांना लागणाऱ्या ऊर्जेकरता मोठा खर्च येतो. ही इमारत लुडी उद्योग समुहाचा एक प्रकल्प आहे. या इमारतीत कार्यालये, दुकाने आणि एक आलिशान हॉटेल आहे. गुईयांग हे पर्वतांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Previous Articleकॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो घेणार घटस्फोट
Next Article अदानी विल्मरला झाला तोटा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









