प्रतिनिधी/ पणजी
पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत येथील एका हॉटेलमधून सुमारे 8 लाख 25 हजार ऊपये किमंतीचा ऐवज लंपास करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून चेरी केलेला ऐवज जप्त केला आहे. संशdियाताच्या विरोधात भादंसं 380 कलमाखाली नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केलेजाईल. याबबत निलेश बोथारे यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटककेलेल्या संशयितांचे नाव पवन मनिकांत (बंगळूर कर्नाटका) असे आहे. तक्रारदार गोव्यात आल्यानंतर ते पणजीतील एका हॉटेलमध्ये राहिले होते. 30 जूनरेजी ते हॉटेलच्याबाहेर गेले असता संशयित त्यांच्या खोलीत गेला व त्यांचे बॅग घेऊन पसार झाला. बॅगमध्ये महागडा कॅमेरा व कॅमेराबाबतचे इतर साहित्या मिळून सुमारे 8 लाख 25 हजार ऊपये किमंतीचा ऐवज होता.
त्याच दिवशी संध्याकाळी 5 च्या सुमारास तक्रारदार हॉटेलमध्ये ला तेव्हा खोलीतील त्यांची बॅग गायब असल्याचे त्याना दिसून आले. त्यांनी त्वरीत पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









