प्रतिनिधी /पणजी
जाद व्याजदर देण्याचे आमिष दाखवून सुमारे दोन हजार लोकांना 3 कोटीचा गंडा घालणाऱया संशयितांला आर्थिक गुन्हा विरोधी (इओसी) पोलिसांनी गुजराथ येथे अटक करून गोव्यात आणले. त्याच्या विरेधात भादंसं 406, 409, 420, 506(2), 120(बी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव विजय कुमार उर्फ किशन कुमार असे आहे. संशयित व इतर नऊ जणांनी मिळून युडिवो प्रवेट लिमिटेट कंपनी सुरु केली होती. फातोर्डा येथे त्यांनी कार्यालय सुरु केले हेते. कमीत कमी वेळेत जादा व्याजदर देण्याचे त्यांनी जाहिरात केली होती. एक प्रकारे त्यांनी लोकांनी अमिष दाखविले होते. लोकांनी कंपनीत पैसे जमा केल्यावर संशयिताने पोबारा केला होता. या बाबत 18 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रार नोंद केल्यानंतर पोलीस संशयिताच्या तपासात होते. संशयित गुजरात येथे असल्याचे समजतात पोलिसांनी गुजराथ गाठले आणि संशय़िताला अटक केली. इओसी निरीक्षक सुरज सामंत यांच्या मार्गदर्शनाकाली उपनिरीक्षक पराग पारेख, कॉन्स्टेबल कृष्णा वळवईकर, व दिनेश सावंत यांनी ही कारवी केली आहे. संशयिताची सुमारे एक कोटीची मालमत्ता असून ती जप्त करण्यात आली आहे. इओसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









