पं. बंगाल येथील पुर्व राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही खेळाडूंचे यश
वेंगुर्ले (वार्ताहर)-
पश्चिम बंगाल येथे नुकत्याच पार पडलेल्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या परशुराम जाधव (सावंतवाडी) व स्वामीसमर्थ बगळे (कुडाळ) या दोन शशस्वी कामगिरी बजावली असून दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पश्चिम बंगाल, आसनसोल येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग चँम्पीयनशिप पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उपरकर शुटिंग अँकॅडमीचे नेमबाज सहभागी झाले होते. या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात परशुराम जाधव व स्वामीसमर्थ बगळे यांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडीचा परशुराम तिलाजी जाधव याने ४०० पैकी ३५५ गुण मिळविले तर स्वामीसमर्थ संजय बगळे यांनी ४०० पैकी ३४७ गुण मिळवत यशस्वी कामगिरी बजावली असून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले. परशुराम जाधव हा सावंतवाडी येथील शुटींग रेंजवर तर स्वामीसमर्थ बगळे हा वेंगुर्ले, कॅम्प येथील शुटिंग रेंजवर प्रशिक्षक कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. कु. आयुष पाटणकर, साहिश तळणकर, श्रीया नाखरे, यांची १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात तर खुशल सावंत, ओमकार सावंत, वैष्णवी भांगले, संजना बिडये, यश पवार (गोवा) यांची निवड १० मीटर एयर रायफल प्रकारात राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे. ६६ वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा ही एअर रायफल प्रकारात नोव्हेंबर मध्ये दिल्ली येथे घेण्यात येणार आहे तर याच दरम्यान १० मीटर एयर पिस्तूल प्रकारातील स्पर्धा भोपाळ शुटिंग रेंज वर खेळण्यात येणार आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले, सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंग असोसिएशन तसेच उपरकर शुटिंग अँकॅडमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.









