पुणे / प्रतिनिधी :
द ऑर्बिस स्कूलमध्ये इयत्ता बारावीत विज्ञान विभागात अद्वय तपस्वी (96.80 टक्के), वाणिज्य विभागात पलक संघवी (95.40 टक्के) आणि हृयुमॅनिटिज विभागात प्रज्ञान परिमिता (95.40 टक्के) यांनी सर्वाधिक गुण मिळविले आहेत. तर दहावीत मिहिका रावत (97.60टक्के), मीनाक्षी ठाकूर (97.20 टक्के), रोशनी गोकेडा (97 टक्के) आणि अक्षता मदाला (97 टक्के) यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.
तर याच शाळेच्या मुंढवा येथील शाखेत बारावीत विज्ञान विभागात आदिती रामाणी (95.20 टक्के), वाणिज्य विभागात सप्तषी बॅनर्जी (94.80 टक्के) या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले आहेत. तर दहावीत चैतन्य तिवारी (98.20 टक्के), ज्ञानेश्वरी कोल्हे (95.60 टक्के) आणि वेदश्री भानगे (94.40 टक्के) यांच्यासह अन्य विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.








