वृत्तसंस्था/ मुंबई
सध्या देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. आतापर्यंत देशात एकूण चार टप्प्यात मतदान झाले असून पाचव्या टप्प्यासाठी सोमवार 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात मुंबईत मतदान होणार असल्यामुळे सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदानादिवशी सुटी जाहीर केली जात असल्यामुळे सोमवारी मतदान होणाऱ्या क्षेत्रांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत. बीएसई सेन्सेक्स मार्केटसोबतच एनएसई निफ्टी, भारतीय इक्विटी बाजारही बंद राहणार आहेत. बीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शेअर बाजार बंद असल्याने त्याच्या इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्हज्, एसएलबी आणि करन्सी सेगमेंटमध्ये कोणताही ट्रेंड होणार नाही.









