सेन्सेक्स निर्देशांक 286 अंकांनी घसरला
मुंबई
जागतिक बाजारातील नकारात्मकता बुधवारीदेखील कायम राहिल्याने याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सलग दुसऱ्यादिवशी बुधवारी नकारात्मक दिसून आला. सेन्सेक्स निर्देशांक 286 अंकांनी घसरत बंद झाला. मेट्रो ब्रँडस् व अॅक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 286 अंकांनी म्हणजेच 0.44 टक्के इतका घसरत 65226 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 92 अंकांनी म्हणजेच 0.47 टक्के घसरत 19436 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 21 समभाग नुकसानीसह बंद झाले होते. अॅक्सिस बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये 9 समभाग हे तेजीसह बंद झाले. यामध्ये नेस्ले इंडियाचा समभाग 2.79 टक्के वाढत बंद झाला. हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंटस्, टीसीएस, इन्फोसिस यांचे समभाग मजबूत होत बंद झाले. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांचे समभाग सर्वाधिक 6.30 टक्के वाढीसह बंद झाले. एव्हेन्यू सुपरमार्ट, सीई इन्फो सिस्टीम यांचे समभागसुद्धा तेजीत राहिले होते. दुसरीकडे इंडिया बुल्स हौसिंगचे समभाग 7.15 टक्के इतके सर्वाधिक घसरले होते. या सोबत मेट्रो ब्रँण्डस 5.76 टक्के, जेएसडब्ल्यू एनर्जी 5.35 टक्के, मण्णापूरम फायनान्स 5.10 टक्के घसरलेले पाहायला मिळाले.
विदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारीही बाजारामध्ये विक्रीवरच भर दिला होता. बँकांचा निर्देशांक 2 टक्के इतका घसरणीत होता. या दरम्यान अदानी एंटरप्रायझेस यांचे समभागही 3 टक्के वाढत व्यवहार करीत होते. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा विचार करता ऑटो, वित्तसेवा, फार्मा, खासगी बँक आणि रियल्टी निर्देशांक घसरणीसह कार्यरत होते. जागतिक बाजारात युरोपातील बाजारात मिश्र कल होता. तर अमेरिकेतील बाजार घसरणीत होते. आशियाई बाजारातही घसरण होती.









