सेन्सेक्स 62 अंकांनी घसरणीत : माध्यम निर्देशांक दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीसा घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 62 अंकांनी घसरला होता. माध्यम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये दबाव पाहायला मिळाला. दुसरीकडे सरकारी बँकांचे समभाग दोन टक्के इतके वाढले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 62 अंकांनी घसरून 80364 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 20 अंकांनी घसरून 24634 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभाग तेजीसमवेत तर 14 समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. सकाळच्या सत्रामध्ये 400 अंकांनी सेन्सेक्स आणि 130 अंकांनी निफ्टी तेजीत होते. निर्देशांकामध्ये पाहता माध्यम क्षेत्राचा निर्देशांक जवळपास एक टक्का इतका घसरणीत राहिला होता. ऑटो, आयटी, फार्मा आणि प्रायव्हेट बँक यांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते. दुसरीकडे सरकारी बँकांचा निर्देशांक दोन टक्के तर ऑइल आणि गॅस व रियल्टी निर्देशांक एक टक्का पेक्षा जास्त तेजीत होते. समभागांमध्ये पाहता इंडसइंड बँक 3 टक्के, टायटन 2.70 टक्के आणि हिंडाल्को 1.65 टक्के इतके वाढत बंद झाले तर दुसरीकडे मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक, डॉक्टर रे•ाrज लॅब यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.
जागतिक बाजारातले चित्र
आशियाई बाजारात मिश्र कल होता. आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 0.69 टक्के घसरणीत राहिला होता तर कोरियाचा कोस्पी 1.33 टक्के वाढत बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 1.89 टक्के इतका वाढला होता. चीनचा शांघाय कंपोझिट 0.90 टक्के वाढत व्यवहार करत होता. 26 सप्टेंबरला अमेरिकेतील डोव्ह जोन्सचा निर्देशांक 0.65 टक्के वाढत बंद झाला होता. नॅसडॅक कंपोझिट 0.44 टक्के व एस अँड पी -500 निर्देशांक सुद्धा 0.59 टक्के तेजीत राहिला होता.









