केवळ तीन दिवस फुलणारे कॉर्प्स फ्लॉवर
अनेक फुलांचा सुगंध आनंद देणारा असतो. परंतु तुम्ही कधी जगातील सर्वात दुर्गंधी फुलाविषयी ऐकले आहे का? हे असे फूल आहे, ज्याचा दुर्गंध सडलेल्या मृतदेहांपेक्षा अधिक धोकादायक असतो. हा दुर्गंध सहन करणे अत्यंत अवघड असते तरीही हे फूल पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. तसे या फुलाचे नाव ‘कॉर्प्स फ्लॉवर’ आहे. परंतु याला मृत फूल या नावाने देखील ओळखले जाते. कारण या फुलाचा गंध सडलेल्या मृतदेहांप्रमाणे असतो. हे सर्वाधिक दुर्गंधीयुक्त फूल आहे. हे केवळ 3 दिवसापर्यंत फुलते. परंतु याचा गंध अनेक किलोमीटरपर्यंत फैलावतो. पूर्ण जगात आतापर्यत केवळ 140 वेळाच हे फूल उगविता आले आहे. हे प्रतिदिन 6 सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते. कॉर्प्स फ्लॉवर सध्या पॅलिफोर्नियाच्या हटिंग्टन लायब्रेरी बोटॅनिकल गार्डन्समध्ये फुलले आहे. हे फूल पाहण्यासाठी आता मोठ्या संख्येत पर्यटक पोहोचत आहेत. एमाफॉफैलस टायटॅनम प्रजातीचे हे फूल 2.43 मीटर लांब आहे. तर याची उंची 12 फूटांपर्यत असू शकते. तसेच हे फूल फुलण्यास सुमारे 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो. याचमुळे या फुलाला जगातील सर्वात दुर्लभ फुलांमध्ये सामील करण्यात आले आहे. या फुलाचा गंध तीव्र असतो कारण हे परागीकरणासाठी किटकांना आकर्षित करतात. दुर्गंधामुळे किटक नजीक येताच हे फूल त्यांना गिळकृंत करते. अशा स्थितीत हे फूल मोठ्या आकाराचे असते, या फुलाच्या आकारामुळे याला कॉर्प्स म्हटले जाते.









