निपाणी : कसनाळ येथील काँग्रेसचे कट्टर समर्थक अशोक नाईक ,सुखदेव नाईक ,शिवाजी नाईक व चंद्रकांत कांबळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत निपाणी मतदारसंघातली राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी केले.
यावेळी उत्तम पाटील म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवत अनेक दिग्गज नेते व असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मध्ये प्रवेश करत पाठिंबा देत आहेत. त्यांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









