कोल्हापूर-राज्यात २७ वी महापालिका म्हणून इचलकरंजी शहराची घोषणा आज करण्यात आली. इचलकरंजी ही कोल्हापूर जिल्ह्यात दुसरी महापालिका ठरणार आहे. आहे ती हद्द ठेवून इचलकरंजीत आता महापालिका होणार असून खासदार धैर्यशील माने यांनी माहिती दिली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागील वर्षी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना इचलकरंजी शहरास महापालिका देण्यास प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले होते. वर्षभरातच इचलकरंजी वासीयांना ही बातमी मिळाली आहे.
राज्य शासनाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील २८ वी महापालिका म्हणून राज्य सरकारने ही घोषणा केली. इचलकरंजीची ओळख ही महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर अशी आहे. वस्त्रोद्योगासाठी इचलकरंजी हे प्रसिद्ध असून लोकसंख्याही मोठी आहे. त्यामुळेच इचलकरंजी ही महानगरपालिका घोषित करावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू होती. आता इचलकरंजी महानगरपालिकेच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना राज्य शासनाकडून नव्या इचलकरंजी महापालिकेच्या मान्यतेचे पत्र मिळाले आहे.
इचलकरंजी शहर हे राज्यातील पाच लाख लोकसंख्या पेक्षा कमी असलेल्या शहरात सर्वाधिक लोकसंख्येने वाढणारे शहर म्हणून ओळखली जाते. दरडोई उत्पन्नातही इचलकरंजी शहर राज्यात अव्वल आहे. इचलकरंजी लगत असणारी अनेक गावे या शहराशी जोडली गेली आहेत. त्यामुळे इचलकरंजी सह नजीकच्या काही गावांचा समावेश करून महानगरपालिका करण्याबाबत सुरुवातीस हालचाली सुरू होत्या. मात्र अनेक गावांनी त्याबाबत विरोध दर्शवला. त्यामुळे केवळ इचलकरंजीच्या लोकसंख्येवर महापालिका होणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत सातत्याने खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला.
केवळ इचलकरंजी शहर हद्द निश्चित करून महानगरपालिका करण्याबाबत प्रस्ताव करण्याचे काम गेले काही महिने प्रशासकीय पातळीवरून सुरू होते. शासनाने या बाबतची आज अधिसूचना जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी शहराची सध्या असलेली हद्द कायम ठेवून महानगरपालिका करण्यात आले आहे. त्यामुळे नजीकचे गावे समाविष्ट होणार का याबाबतचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. इचलकरंजी शहराची 2011 मध्ये झालेल्या जनगणनेवेळी 2लाख 85 हजार इतकी लोकसंख्या होती. सध्या ही लोकसंख्या तीन लाखापेक्षा अधिक आहे