वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावातील वॉर्ड क्रमांक 6 मधील स्मशान रोड कॉर्नर मुख्य रस्त्यापासूर सुरज पाटील यांच्या घरापर्यंत गेली अनेक वर्षे काँक्रीट गटार नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येवून दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत होते. पावसाच्या पाण्यामुळे तर येथील रस्त्याला तलावाचे स्वरुप प्राप्त होत होते. या सर्व दुर्गंधीशी तेथील नागरिकांना सामना करावा लागत होता. गेल्या 30 वर्षांपासून या गटारीचे काम रखडले होते. परंतु वॉर्ड क्रमांक 6 चे ग्राम पंचायत सदस्य शोधन तुळसकर यांच्या पुढाकारातून व ग्रा. पं. सदस्य राकेश पाटील, विनायक कम्मार, वैजू बेन्नाळकर यांच्या सहकाऱ्यांतून व ग्राम पं. माध्यमातून काँक्रीट गटारीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.









