वृत्तसंस्था/ कोची
ग्रीनफिल्ड स्टेडियमवर 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या सराव सामन्यांसाठी टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ थिऊवनंतपुरममध्ये रविवारी रात्री उशिरा पोहोचणार आहे. दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ अफगाणिस्तानचा संघही येणार आहे, जो त्याच्या दुसऱ्या दिवशी शहरात पोहोचेल. शुक्रवारी 29 सप्टेंबरला होणार असलेल्या पहिल्या सराव सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
27 सप्टेंबर रोजी भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतरच ऑस्ट्रेलिया तिऊअनंतपुरमला येणार आहे. त्याच ठिकाणी 30 सप्टेंबर रोजी होणार असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात त्यांचा सामना नेदरलँड्सशी होईल. या सामन्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना होईल आणि अंतिम सराव सामन्यात भारत 3 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.
केरळ क्रिकेट संघटनेचे अधिकारी थिऊवनंतपुरममध्ये खेळणार असलेल्या या सहा संघांसाठी तीन सराव सुविधा तयार करत आहेत. ग्रीनफिल्ड स्टेडियमला भिडून असलेल्या जाळ्यात सरावाच्या सुविधेव्यतिरिक्त थुंबा येथील सेंट झेवियर्स कॉलेजचे मैदान आणि मंगलापूरममधील केसीए स्टेडियम येथे सरावाची सुविधा पाहुण्या संघांना पुरविली जाईल.
‘आम्ही ग्रीनफिल्ड स्टेडियमजवळील जाळ्यात सरावाच्या सुविधेच्या ठिकाणी फ्लडलाईट्स लावले आहेत. स्टेडियममधील ड्रेसिंग रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आम्ही स्टेडियममधील काही खराब झालेल्या जागाही बदलल्या आहेत. राज्यात प्रथमच सहा आघाडीचे क्रिकेट संघ एका ठिकाणी खेळणार आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली. सराव सामन्यांच्या संदर्भात पाहुण्या संघांना सर्वोत्तम सुविधा देऊ शकू अशी आम्हाला आशा आहे, असे केसीएचे सचिव विनोद एस. कुमार यांनी म्हटले आहे.
5 ऑक्टोबरला विश्वचषक सुरू होण्यापूर्वी थिऊवनंतपुरममधील हे सामने म्हणजे सहाही संघांसाठी तयारी करण्याच्या दृष्टीने शेवटची संधी असेल. मात्र यावर हवामान विरजण घालू शकते. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरात अधूनमधून पाऊस पडत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पाहुण्या संघांच्या तयारीच्या शेवटच्या फेरीवर परिणाम होऊ शकतो.
नेदरलँड्स संघ आज पोहोचणार

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेदरलँड्सचा क्रिकेट संघ आज 20 सप्टेंबर रोजी भारतात येणार आहे. डच संघ त्यांची तयारी सुरू करण्यासाठी पहाटे बेंगळूर येथे उतरेल. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील संघ 21 सप्टेंबरपासून अलूरमध्ये सराव सुरू करेल. संघ थिरुवनंतपुरमला जाण्यापूर्वी 28 सप्टेंबरपर्यंत अलूरमध्ये थांबण्याची अपेक्षा आहे. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 12 नोव्हेंबर रोजी होणार असलेल्या भारताविऊद्धच्या लढतीने डच संघाच्या विश्वचषकातील गट स्तरावरील मोहिमेचा शेवट होईल. नेदरलँड्सने एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरताना वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडसारख्या संघांना पराभूत केलेले आहे.









