प्रचारफेरीत हजारोंच्या संख्येने महिलांसह तऊणांचा सहभाग : सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा : जेसीबीच्या साहाय्याने केंडुस्करांना भव्य पुष्पहार अर्पण

बेळगाव : पिरनवाडी येथे चक्क जेसीबीच्या सहाय्याने दक्षिण मतदारसंघाचे म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पिरनवाडी परिसरातून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. पिरनवाडीबरोबरच मच्छे गावातूनही महिलांसह तरुणांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अशा घोषणांनी संपूर्ण मच्छे व पिरनवाडी परिसर दणाणून गेला. पिरनवाडी आणि मच्छे गावातील सर्वच युवक मंडळांनी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी महिला मंडळांनीही स्वयंस्फूर्तीने त्यांना पाठिंबा दिला. यावेळी सीमालढ्यामध्ये हुतात्मा झालेल्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठी माणसांनी हुतात्म्यांचे स्मरण करून समितीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले. मराठी माणसाच्या हक्कासाठी मी सतत प्रयत्न करेन, असे ठोस आश्वासन रमाकांत कोंडुस्कर यांनी यावेळी दिले आहे. मच्छे गावातून भव्य अशी पदयात्रा गुरूवारी काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता पाटील गल्ली, लोहार गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचारफेरीला सुरूवात झाली. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य गणपत जाधव यांनी स्वागत केले. रोहन अनगोळकर यांनी प्रास्ताविक केले.
माजी ग्राम पंचायत सदस्य महादेव मंगणाकर, शिवा चौगुले, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा लोहार, बाबू लाड, माजी नगरसेवक अनिल पाटील, कृष्णा अनगोळकर, मारुती लाड, मनोहर लाड, तानाप्पा हावळ, प्रवीण हावळ, शांता हावळ, रेणूका लाड, मीना लोहार, सुवर्णा कऱ्याण्णावर यांनी रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत केले. प्रचारफेरीमध्ये भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि सीमाप्रश्नाच्या घोषणा यामुळे सर्वत्र समितीमय वातावरण झाले होते. आनंद गल्ली, पाटील गल्ली, जैन गल्ली, मारुती गल्ली, मरगाई गल्ली, महादेव गल्ली, विजय गल्ली, गावातील विविध युवक मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वार्षिक साप्ताहिक फंड, महिला मंडळ, भवानी युवक मंडळ, धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळ, मरगाई मंदिर ट्रस्ट कमिटी, शिवनेरी युवक मंडळ, गणपत गल्ली, शिवशक्ती युवक मंडळ यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी पुंडलिक कणबरकर, जयपाल लाड, संजू सुळगेकर, अमोल लाड, एन. एन. शिंदे, सुरेश लाड, रामचंद्र चळवळकर, विजय इंगळे, राजू चौगुले, केदारी करडी, जतीन गुंडोळकर, नागेश कुंडलकर, राजू लाड, सागर कंकर, संभाजी कंकर, गजानन छत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









