भिंतीला डोकं आपटून केली हत्या
वृत्तसंस्था/ कासरगोड
केरळच्या कासरगोडमध्ये एका महिलेला तिच्याच मुलाने मोबाइल वापराच्या व्यसनाबद्दल ओरडणे जीवघेणे ठरले आहे. महिलेने स्वत:च्या मुलाला मोबाइलच्या वापराबद्दल दटावले होते, ज्यानंतर या मुलाने स्वत:च्या आईवर निर्दयपणे हल्ला केला. 63 वर्षीय महिलेचा कन्नूर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रुक्मिणी या स्वत:चा पुत्र सुजीतला मोबाइलचा वापर अधिक करू नको असे सातत्याने बजावत होत्या. यामुळे भडकलेल्या सुजीतने स्वत:च्या आईचे डोकं भिंतीवर आपटले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली होती. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि अलिकडेच त्याला कोझिकोड येथील कुथिरावट्टमच्या शासकीय मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असे सांगण्यात येते.









