एखादा भारतीय जवान देशसेवेसाठी कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्यानंतर एरवी त्यांच्या पत्नीला दुर्लक्षित केलं जातं, शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाते. मात्र कालांतराने सर्वांना त्यांचा विसर पडतो. वीर पत्नीकडे कुणीच लक्ष देत नाही. परंतु बागलकोट येथील संतोष भावीकट्टी या जवानाने समाजाच्या या अनिष्ट प्रथेला छेद दिला आहे. त्याने आपल्या लग्नात शहीदांना अभिवादन करण्यासह विजापूर जिल्ह्यातील त्यांच्या वीरपत्नींचा सत्कार करून एक स्वागतार्य पायंडा घालून दिला आहे. वीरपत्नींच्या सन्माना प्रसंगी सुनिता पाटील रेखा खादरवाडकर, लक्ष्मी कुटाळे, महादेवी कोप्पद, संगीता बामनळी आणि वधू वरासह लग्नाला आलेली पाहुणे मंडळी उपस्थित होते.
या लग्न सोहळ्यामध्ये मिळालेला सन्मान पाहून वीरपत्नी भारावून गेल्या होत्या. जवान संतोष यांनी वीरपत्नींचा सन्मान करून त्यांच्या दिवंगत पतीचा त्याग समाजा समोर आणून दिला. याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.