जगात अनेक भागांमध्ये भूतांचा वास असल्याचे सांगण्यात येते. परंतु भुताटकीनेयुक्त असलेली शहरे कमीच असल्याचे मानले जाते. अशा शहरांमध्ये ठिकठिकाणी कथित स्वरुपात भूताच्या अस्तित्वाच्या घटना घडत असतात. परंतु ब्रिटनचे ग्लस्टनबरी याप्रकरणी काही अनोखे आहे. याला ब्रिटनची रहस्यमय राजधानी म्हटले जाते. येथे कथित स्वरुपात अनेक ठिकाणं भूतांशी संबंधित आहेत. यासंबंधी अनेक कहाण्याही प्रचलित आहेत.
30 भूतं असलेला पब
500 वर्षे जुना जॉर्ज अँड पिलग्रिम्स इन स्वत:च्या सर्पिल जिने आणि प्राचीन लाकडासाठी ओळखला जातो. परंतु येथे 30 वेगवेगळ्या भूतांचा वास असल्याची वदंता आहे. यातील एक हुडवाला भिक्षू सर्वात भीतीदायक आहे .हे भूत रात्री कॉरिडॉरमध्ये फिरते असे स्थानिकांचे सांगणे आहे. या भिक्षूचे एका महिलेवर प्रेम होते, अपराधबोधाच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली होती. त्याचे भूत आजही येथे भटकत असल्याची वदंता आहे.
अजब घटना
पबचे कर्मचारी अजब घटनांविषयी बोलतात, तापमान अचानक कमी होते. नळ आपोआप सुरू होतो आणि बंद होतो. खोल तळघरांमध्ये पावलांचा आवाज अन् आकृती दिसतात, एक पांढऱ्या वेशातील महिला लोकांदरम्यान फिरताना दिसून येते. सीसीसीटीव्हीत तरंगणारा प्रकाश दिसून येत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
ग्लास्टनबरीचा मठ
ग्लास्टनबरीच्या मठाची कहाणी देखील कमी भीतीदायक नाही. 16 व्या शतकात हेन्री सातव्याने हा मठ नष्ट करण्याचा आदेश दिला होता. त्यांनी जॉर्ज अँड पिलग्रिम्समधून हा मठ जळताना पाहिला होता. आजही येथील भिक्षूंची भूतं भिंतीजवळून जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे सांगणे आहे.
हायस्ट्रीटचे भूत
याचबरोबर कथित स्वरुपात आणखी अनेक ठिकाणी भूतं आहेत. ग्लास्टनबरीनजीक 1685 मध्ये सेडगमूर येथे संघर्ष झाला होता. ड्यूक ऑफ मॉनमाउथचे बंड अपयशी ठरले होते. शहरात फासावर लटकविण्यात आलेल्या बंडखोरांचे भूत दिसून येत असल्याचा दावा करण्यात येतो. काही लोकांनुसार रात्री हायस्ट्रीटवर सैनिकांच्या पावलांचा आवाज ऐकू येतो. प्रसिद्ध जादूगार डायनी फॉर्च्यून येथेच राहत होती. आता हे न्यूज एज समुदायाचे केंद्र आहे. येथे क्रिस्टल, अध्यात्मिकता आणि जादूटोण्याशी संबंधित 20 हून अधिक दुकाने आहेत.
ग्लास्टो फेस्टिव्हल
ग्लास्टनबरी येथे दरवर्षी आयोजित होणारा ग्लास्टो फेस्टिव्हल देखील भूतांच्या कहाणींनी व्यापलेला आहे. ग्लास्टनबरीचा प्रत्येक कोपरा रहस्य अन् भीतीदायक कहाण्यांशी संलग्न आहे. हे शहर भूतांच्या कथा अन् अलौकिक शक्तींच्या दाव्यांचे मुख्य केंद्र आहे. येथे अनेक घोस्ट हंटर्स आले असून त्यांनी स्वत:चे अनुभव जगाला शेअर केले आहेत. अनेक लोक येथे केवळ भीतीदायक अनुभवासाठी येणे पसंत करतात.









