मानवी नखापेक्षाही लहान
घर, ऑफिस किंवा अन्य ठिकाणी तुम्ही वॅक्यूम क्लीनर पाहिला असेल. अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट वॅक्यूम तयार करतात. परंतु जगातील सर्वात छोटा वॅक्यूम क्लीनर हा मानवी नखापेक्षाही छोटा आहे. याचा आकार 0.65 सेंटीमीटर इतका आहे.
23 वर्षीय एक भारतीयाने हा जगातील सर्वात छोटा वॅक्यूम क्लीनर तयार केला आहे. या भारतीयाचे नाव तपाला नदामुनी असून त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. त्याने हा मान एकदा नव्हे तर दोनवेळा मिळविला आहे.
नदामुनीचा नवा वॅक्यूम क्लीनर केवळ 0.65 सेंटीमीटरचा आहे. हे उपकरण 2022 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या मागील उपकरणापेक्षा 0.2 सेंटीमीटरने छोटे आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार वॅक्यूम क्लीनरच्या मोजमापाप त्याचे हँडल किंवा कॉर्डला सामील पेले जात नाही.
2020 मध्ये देखील नदामुनीने 1.76 सेंटीमीटरचा एक वॅक्यूम क्लीनर तयार केला होता. परंतु त्याचा हा विक्रम मोडीत निघाल्यावर त्याने पुन्हा तो स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. यात दोनवेळा त्याला अपयश आले. यानंतर त्याने एक नवे डिझाइन तयार पेले, हे उपकरण निकषांची पूर्तता करणारे असावे म्हणून त्याने 50 हून अधिक डिझाइन्स तयार केली होती.
नदामुनीने 2024 मध्ये एका नव्या डिझाइनसोबत विक्रम पुन्हा स्वत:च्या नावावर केला आहे. यावेळी त्याने पेनपेक्षाही छोटा वॅक्यूम क्लीनर तयार केला आहे. त्याची ही अद्भूत कामगिरी सोशल मीडियावर चर्चेत आहे.