सर्वसाधारणपणे गुहेचा आकार गोल असतो. परंतु फिंगलची गुहा स्कॉटलंडच्या डेब्राइड्सच्या निर्जन अटलांटिक बेटावर काही वेगळीच आहे. एक समान चौकोनी गुहांमध्ये वैज्ञानिक वगळता लोक जात नाहीत, परंतु तेथील छायाचित्रांना लोक मोठ्या प्रमाणात पसंती देतात.
फिंगलची गुहा स्टाफा स्कॉटलंडच्या डेब्राइड्सच्या एका निर्जन अटलांटिक बेटावर आढळून येते. येथे समुद्राच्या वर 69 मीटर उंच एक मोठी गुहा आहे, ज्यात एक मोठे प्रवेशद्वार आहे. याचा आकार पाहिल्यास ती एखाद्या मोठ्या संग्रहालयात प्रदर्शित उत्तम कलाकृती असल्याचे वाटते. खास बाब म्हणजे यातील दगडांचा खास आकार लक्षवेधी आहे. तरीही या गुहांना पाहण्यासाठी पर्यटक येत नाहीत.
फिंगलच्या गुहेत गेल्यास अनेक पक्षी प्रजाती दिसून येतात. स्टाफाच्या पर्यटकांमध्ये हे पक्षी अत्यंत लोकप्रिय आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या काही दिवसांदरम्यान पक्षी येथे येतात आणि मे, जून आणि जुलैपर्यंत राहतात. यादरम्यान ते स्वत:च्या पिल्लांचे पालनपोषण करतात. नॅशनल ट्रस्ट फॉर स्कॉटलंडनजीक राष्ट्रीय निसर्ग रिझर्व्हच्या हिस्स्याच्या स्वरुपात ही गुहा आहे.
फिंगलची गुहा ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या बेसॉल्ट स्तंभांमुळे अस्तित्वात आली आहे. जी मोठ्या प्रमाणात षट्कोनीय प्रिज्म आहे, हे स्तंभ पॅलियोसीन लावा प्रवाह आहेत. ठोस लावाचा वरचा आणि खालचा स्तर थंड झाल्याने संकुचन आणि फ्रॅक्चरिंग झाले. हे एक ब्लॉकी टेट्रागोनल पॅटर्नमध्ये सुरू झाले आणि थंड पृष्ठभागांमुळे थेट फ्रॅक्चरसोबत एक नियमित षट्कोनीय प्रॅक्चर पॅटर्नमध्ये बदलले. या भेगा हळूहळू प्रवाहाच्या केंद्रस्थानी जात राहिल्या, यामुळे लांब षट्कोनीय स्तंभ निर्माण झाले, ज्यांना आता लाटांमुळे नुकसानग्रस्त क्रॉस-सेक्शनच्या स्वरुपात पाहिले जाऊ शकते.
फिंगलच्या गुहेत मेहराबच्या आकाराचे छत आणि खुले मुख आहे. जे लाटांमुळे निर्माण झाले आहे. या गुहात पाणी आढळून येते, गुहेच्या मेहराबदार छत याच्या खास नैसर्गिक आवाजाला वाढविते, जे याच्या आत उठणाऱ्या सागरी लाटांच्या ध्वनीशी खास ताळमेळ निर्माण करू लागते.
या गुहेला एक वीर पात्र फिंगलच्या नावावर हे नाव मिळाले आहे. 1700 च्या दशकात स्कॉटिश कवी आणि इतिहासकार जेम्स मॅकफसंन यांच्या एका अनुवादित कवितेत याचा उल्लेख होता. कवितेतील पात्र फिओन मॅक कमहेल फिन मॅककूल नावाच्या एका विशालकाय व्यक्तीच्या आयरिश मिथकाचा संदर्भ होता. मॅकफर्सन यांच्या कवितांच्या लोकप्रियतेच्या काळातच निसर्गवादी सर जोसेफ बँक्स यांनी 1772 मध्ये या गुहेचा दौरा केला आणि तेव्हा याला फिंगलची गुहा असे नाव मिळाले.
फिंगलच्या गुहेचा उल्लेख किंवा चित्रण अनेक कला तसेच साहित्यिक कृतींमध्ये आहे. कवि विलियम वर्ड्सवर्थ, जॉन कीट्स आणि अल्फ्रेड, लॉर्ड टेनिसन समवेत अन्य काही जणांनी स्वत:च्या कवितेत याचा उल्लेख केला आहे. नाटककार आाrगस्ट स्ट्रिंडबर्ग यांनीही स्वत:चे नाटक ए ड्रीम प्लेच्या दृश्यांना फिंगल ग्रोटो नामक स्थानावर सेट केले होते. पिंक फ्लॉइंट यांनी या ठिकाणाविषयी अनेक गाणी लिहिली आहेत.









