नदीवर किंवा अन्य कोठेही बांधलेला सेतू कोसळणे ही ही घटना आपल्या देशात नेहमी घडते, हा आपला अनुभवी आहे. त्यामुळे पडणारे सेतू आपल्याला परिचित आहेत. तथापी, या जगात असा एक सेतू आहे, की जो विशिष्ट परिस्थितीत आपोआप पाण्याखाली बुडतो. हे त्याचे बुडणे अतिवृष्टी झाल्याने, किंवा नदीला पूर आल्याने घडत नाही, हे विशेष वैशिष्ट्या आहे. जेव्हा या सेतूजवळ मालवाहतून करणारी नौका किंवा जहाज येते. तेव्हा त्या नौकेला वाट करुन देण्यासाठी हा सेतू चक्क पाण्याखाली बुडतो. मग मालवाहतूक करणारी नौका त्याच्यावरुन पुढे जाते आणि नंतर हा सेतू पुन्हा नेहमीसारखा होतो. मग त्याच्यावरुन नेहमीची भूमीवरील वाहतूक होत राहते. हा अनोखा सेतू ग्रीस या देशात असून तो इस्टमस ऑफ कोरिंथ नामक मोठ्या कालव्यावर बांधलेला आहे.
हा कालवा 1893 मध्ये निर्माण करण्यात आला आहे. नौकांची वाहतूक सुलभपणे व्हावी आणि वाहतुकीचे अंतर कमी व्हावे यासाठी तो निर्माण करण्यात आला आहे. या सेतूच्या आधी मालवाहतूक करणाऱ्या किंवा अन्य नौकांना तसेच जहाजांना मोठा वळसा घालून जावे लागत असे. ते अंतर 700 किलोमीटरचे होते. मात्र, एका डोंगराच्या मधून हा कालवा काढण्यात आला आणि दोन जलभाग या कालव्यामुळे जोडले गेले. मात्र, त्यांच्या मध्ये असलेल्या दोन भूभागांचा एकमेकांशी असणारा संपर्क मात्र तुटला. तो साधण्यासाठी हा सेतू निर्माण करण्यात आला. सेतूमुळे नौका आडू नयेत म्हणून या सेतूची रचना अशी करण्यात आली, की वाहतूक करणारी नौका किंवा जहाज जवळ आले की हा सेतू उलटा फिरवून कालव्याच्या पाण्यात बुडविला जातो आणि नौकांना वाट करुन दिली जाते.
हा सेतू ज्या काळात बांधला, त्या काळात कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तरीही हा उलट सुलट फिरणारा सेतू त्या काळात कसा निर्माण केला गेला असेल, यावर आजही संशोधन होत आहे. हा सेतू मध्ययुगानंतरच्या काळातील अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. तो पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.









