कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ग्लोब थिएटरजवळच्या इन्डिपेंडेंट रोडवर फूटपाथ खचला असल्याने धोका निर्माण झाला आहे. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने एखाद्या विद्यार्थ्याचा पाय अडकून अपघात होण्याची शक्यता असल्याने कॅन्टोन्मेंटने लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ग्लोब थिएटरपासून सेंट पॉल्स शाळेपर्यंत काही वर्षांपूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले होते. काही ठिकाणी पेव्हर्सच्या खालील जमीन खचल्याने पेव्हर्स खाली सरकले आहेत. त्यामुळे या पेव्हर्सवरून चालताना रात्रीच्यावेळी पाय अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातापूर्वीच दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.









