कोल्हापूर / संग्राम काटकर :
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये उशिराने का होईना पण, अत्याधुनिक बनावटीचे इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग टारगेट मशीन्स लवकरच बसवण्यात येणार आहेत. सोबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील शुटींग रेंजमध्ये जे जे साहित्य वापरले जाते ते ते साहित्य ही क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर उपलब्ध केले जाणार आहे.
टेंडर पद्धतीने साताऱ्यातील झेनिथ स्पोर्टस्कडून मशीन्स व अन्य आधुनिक साहित्य रेंजमध्ये शुटींग रेंजवर बसवले जाणार आहेत. त्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित धरला आहे. ज्या दिवशी शुटींग रेंजवर आधुनिक मशिन्ससह अन्य साहित्य बसवले जाईल, त्या दिवसापासून ही रेंज खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाची रेंज म्हणून नावाऊपाला येणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलात 2014-15 साली शूटिंग रेंज उभारण्यात आली. परंतू या रेंजवर परदेशी बनावटीचे टारगेट मशीन्स येण्यासाठी 2021 हे साल उजाडावे लागले. दरम्यानच्या काळात रेंजवर आधुनिक साहित्य उपलब्ध करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जात होती. परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शुटींग रेंजवर आधुनिक टारगेट मशीन्स येऊ शकली नाही, असे संबंधीत अधिकारीच सांगताहेत. मग अनेक प्रयत्न कऊन शासनाकडून मिळवलेल्या थोड्या निधीतून टेंडर प्रक्रियाद्वारे शुटींग रेंजवर 10 मीटर टारगेट रेंजची 15, 50 मीटर टारगेट रेंजची आठ आणि 25 मीटर टारगेट रेंजची 5 मशीन उपलब्ध बसवली. परंतू ही सर्व मशिन्स 2023 मध्ये नेमबाजांना सरावासाठी उपलब्ध केल्या. उशिराने का होईना थोड्याफार नेमबाजांना आधुनिक टारगेट मशीन्सवर सराव करणे सोपे झाले. या सरावाच्या जोरावर काही नेमबाजांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत पदके मिळवली.
कांबळवाडीतील (ता. राधानगरी) येथील ऑलिम्पिकवीर नेमबाजी स्वप्नील कुसाळेने अलीकडेच झालेल्या पॅरीस ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकून भारतासह क्रीडानगरी कोल्हापूरचे नाव रोशन केले. स्वप्नीलच्या या कामगिरीपासून प्रेरणा घेतलेल्या कोल्हापुरातील अनेक तऊण–तऊणींमध्ये नेमबाजीत करिअर करण्याची ऊर्मी जागृत झाली आहे. शेकडो तऊण तऊणी तर विभागीय क्रीडा संकुलात दाखल होऊन आम्हालाही संकुलातील शुटींगवर येऊ नेमबाजी शिकायची आहे, असे विभागीय क्रीडा संकुल समितीतील अधिकाऱ्यांना सांगत आहे. शिवाय अन्य ठिकाणीही नेमबाजीचा सराव करणारे नेमबाजही विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंज केव्हा आधुनिक करणार, अशी विचारणाही समितीकडे करत होते.
या विचारणेला समितीने गांभिर्याने घेऊन शुटींग रेंजमधील पुर्वीच्या टारगेट मशीन्समध्ये आणि आणखी टारगेट मशीन्सची भर घालून रेंजला आधुनिक बाज आणण्याचे पाऊल उचलले. टेंडर प्रक्रीयाद्वारे टारगेट मशीन्ससह अन्य आधुनिक साहित्यही रेंजवर उपलब्ध करण्याची मानसिक तयारी केली. बालेबाडीच्या धर्तीवर आधुनिक टारगेट मशीन्सह अन्य सोयी–सुविधा शुटींग रेंजवर उपलब्ध केल्या तर फक्त कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील तऊण–तऊणींना नेमबाजीचे धडे घेऊन राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारणे सोपे होईल, असाही समितीने प्राथमिक अंदाजही बांधला.
समितीकडे उपलब्ध असलेल्या तब्बल तीन कोटी ऊपयांमधील काही पैसे शुटींग रेंज आधुनिक करण्यावर खर्च करण्याचे ठरवले. तातडीने टेंडर प्रक्रीया राबवण्यात आली. पाच जणांकडून समितीकडे टेंडर भरण्यात आले. अगदी अलिकडेच साताऱ्यातील झेनिथ स्पोर्टस्च्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. याच झेनिथ स्पोर्टस्कडून शुटींग रेंजवर आधुनिक टारगेट मशीन्स बसवण्याच्या कामाला सुऊवात करण्यात येईल. याचबरोबर रेंजवर 50 मीटर रेंजचा सराव करणाऱ्या नेमबाजांसाठी 50 मीटरचे प्रोन मॅटची व्यवस्थाही केली जाईल. रायफल, पिस्तूलसह अन्य साहित्य रेंजवरच ठेवण्यासाठी भक्कम अशी लॉकर्ससुद्धा शुटींग रेंजवर तयार केले जाणार आहेत. एअर पीस्तुल व एअर रायफलमध्ये एअर भरण्यासाठी लागणारे कॉम्प्रेसर मशीन शुटींग रेंज उपलब्ध करण्यात येणार आहे. परदेशी बनावटीच्या टारगेट मशिन्ससाठी यूपीएस बॅकअपची सिस्टीम, 25 व 50 मीटर रेंजमधील अँटी स्किड मॅटही रेंजवर उपलब्ध केले जाणार आहे. येत्या चार ते पाच महिन्यात सर्व सोयी–सुविधाची कामे पूर्ण कऊन शुटींग रेंज नेमबाजासाठी केली जाणार आहे.
- बालेवाडीच्या धर्तीवर आधुनिक शुटींग रेंज बनवणार…
विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजवर एकाच वेळी जास्ती नेमबाजांना आधुनिक सराव करण्यात मर्यादा येत होत्या. या मर्यादेमुळे अनेक नेमबाजांना सरावासाठी अक्षरश: झुरावे लागत होते. आता असे होणार नाही. लवकरच शुटींग रेंजवर टारगेट मशीन्ससह अन्य सोयी–सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. शुटींग रेंजवर सर्व आधुनिक सोयी सुविधा करण्यासाठी टेंडर प्रक्रीया राबवली गेली. त्यानुसार पाच जणांनी टेंडर भरले आहे. यापैकी साताऱ्यातील झेनिथ स्पोर्टस्च्या या टेंडरला मंजुरी देऊन वर्कऑर्डर ही काढली आहे. आता लवकरच शूटिंग रेंजवर सर्व साहित्य बसवून तिला बालेवाडीच्या धर्तीवर आधुनिक बाज आणण्यात येईल.
माणिक पाटील (सचिव : विभागीय क्रीडा संकुल समिती)
- शुटींग रेंजवर बसवली जाणारे मशीन्स…
-10 मीटर रेंजचे दहा टारगेट मशीन,
-25 मीटर रेंजचे तीन टारगेट मशीन,
-50 मीटर रेंजचे पाच टारगेट मशीन्स








