15 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित
बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत लवकरच दाक्षिणात्य चित्रपटात दिसून येणार आहे. मागील काही काळापासून या चित्रपटाची चर्चा होत आहे. निर्मात्यांनी यापूर्वीच सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली आहे. अशा स्थितीत ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समारे आली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून निर्मात्यांनी एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. चंद्रमुखी 2 हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाऊ शकतो.

कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांच्या ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. हा चित्रपट पी. वासू यांच्याकडून दिग्दर्शित अन् 2005 मध्ये प्रदर्शित कॉमेडी हॉररपट ‘चंद्रमुखी’चा सीक्वेल आहे. चंद्रमुखी या चित्रपटात रजनीकांत, ज्योतिका, नयनतारा आणि प्रभू यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
पी. वासू यांच्याकडून दिग्दर्शित चंद्रमुखी 2 या चित्रपटात राघव लॉरेन्स, कंगना रनोत, वडिवेलु, राधिका सरथकुमार, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, सुभिक्षा कृष्णन, रवि मारिया, कार्तिक श्रीनिवासन यासारखे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.









