बॉलिवूड अभिनेत्री क्रीति सेनॉनने आता चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अलिकडेच तिने स्वत:च्या प्रॉडक्शन कंपनीचा पहिला चित्रपट ‘दो पत्ती’ची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे.
निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक देखील जारी केला आहे. चित्रपटनिर्मात्यांनी शेअर केलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये काजोल, कनिका ढिल्लों आणि क्रीति सेनॉन दिसून येत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण अलिकडेच मुंबईत सुरू झाले आहे. काजोल आणि क्रीतिने यापूर्वी 8 वर्षांआधी ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोन्ही अभिनेत्री आता पुन्हा एकदा एकत्र दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक चतुर्वेदी करणार आहे. हा चित्रपट एक मिस्ट्री-थ्रिलर धाटणीचा आहे. क्रीतिने स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसचे नाव ब्ल्यू बटरफ्लाय ठेवले आहे. चित्रपटनिर्मितीचे काम मला नेहमीच मजेशीर आणि पसंतीचे वाटत राहिले आहे. मनाला भिडणाऱ्या कहाण्यांपैकी अधिक रचनात्मक स्वरुपात सामील होऊ इच्छिते. एक निर्माती म्हणून अत्यंत प्रतिभावंत कनिका ढिल्लोंसोबत मी काम करत असल्याचे क्रीतिने म्हटले आहे. क्रीतिचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.









