दररोज २०० लाभार्थी या थाळीचा आस्वाद घेतात
राधानगरी /महेश तिरवडे
महाराष्ट्र शासनाने सन २०२० साली महाराष्ट्र शिवभोजन थाळी योजना राबवण्यास सुरुवात केली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने गोरगरीब जनतेला व कष्टकरी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात दहा रुपयात पोटभर जेवण ही संकल्पना शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात आणली, राधानगरी तालुक्यातील अनेक नागरिक कामानिमित्त मुख्यालयाला येत असतात,मात्र या ठिकाणी असलेल्या खानावळीमध्ये शंभर रुपयांपेक्षा जास्त दराने जेवणाची थाळी असते, ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी म्हणून ही कल्याणकारी योजना राबविण्यात आली आहे
राज्य शासनाला हि थाळी शहरी भागात पन्नास रुपये व ग्रामीण भागात 35 रुपये दराने आजही दिली जाते,आणि गोरगरिबांना ही शिवभोजन थाळी दहा रुपयात उपलब्ध करून दिले जाते, वितरकाला उर्वरित रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते या शिवभोजनात भात, डाळ, वरण, दोन चपात्या, भाजी असे पदार्थ असून सर्वसामान्य नागरिकांना ही शिवभजन थाळी अधिकच वरदायिनी आहे, जवळपास राधानगरी तालुक्यातून दिवसाला दोनशेच्या आसपास शिवभोजन थाळीची विक्री केली जाते , यामध्ये गरीब गरजू महिला विद्यार्थी, महाविद्यालय युवक युवती या थाळीचा आस्वाद घेताना ग्रामीण भागात दिसत आहे , सद्या तालुक्यातील बांधकाम मजूर, बचत गटाच्या महिला, विश्वकर्मा योजनेसाठी आलेले लाभार्थी हे शासकीय कामानिमित्त किंवा बँकेच्या कामानिमित्त येत असतात, यामुळे शिवभोजन लाभार्थीची संख्या लक्षात घेता भविष्यात आणखी शिवभोजन थाळीची संख्या वाढवावी किंवा नवीन शिवभोजन केंद्र स्थापन करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे
प्रतिक्रिया
सद्या राधानगरी तालुक्याच्या बसस्टॅण्ड व मुख्य बाजारपेठ या दोन ठिकाणी शिवभोजन केंद्र असून या ठिकाणीं सकाळी 11ते 2या वेळेत 200 लाभार्थी लाभ घेतात, मात्र तालुक्याच्या ठिकाणी काही कार्यक्रम, मेळावे, आंदोलने असली की काही वेळेस जेवण लवकर संपते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोयीसाठी आणखीन शिवभोजनच्या थाळ्या वाढवाव्यात व आणखीन एक शिवभोजन केंद्र उभारण्यात अशी मागणी होत आहे








