शिरोळ प्रतिनिधी
हिंदू धर्मामध्ये देशी गाईला फार मोठे महत्त्व आहे. शिरोळ येथील अण्णासाहेब धनपाल शेट्टी कुटुंबियांनी देशी गाईचं सातव्या महिन्यामध्ये डोहाळेजेवण घालून आपल्या मूक प्राण्यांवर असलेली श्रद्धा अधिक दृढ केली आहे.
येथील नमाजग्याच्या माळावर राहणारे अण्णासाहेब धनपाल शेट्टी व सौ स्वप्ना शेट्टी यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या देशी गाई आहेत. लक्ष्मी नावाच्या देशी गाईला पहिल्यांदाच सातवा महिना सुरू झाला. याचे औचित्य शेट्टी कुटुंबियांनी व राजमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या देशी गाईचे डोहाळे जेवण (दिन) घालण्याचा निर्णय घेतला. या गाईची साडी व खणा नारळाने ओटी भरली.इतकाच नाही तर हार तुरे फुलांनी गाईला सजवण्यात आले होते. यावेळी अनेक उपस्थित महिलांनी औक्षण केले.
अण्णासाहेब शेट्टी हे शेतकरी आहे. अनेक वर्षे देशी गाई पाळत असून देशी गाईपासून मिळालेले दूध तूप गरजूंना ते मोफत देत असतात. लक्ष्मी गाईचा सातवा डोळेजेवणाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करून अनेकांना सुखद धक्का दिला सध्या कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्याच्या कलियुगात देशी गाईचे महत्त्व असून देशी गाईच्या सहवासामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रत्येक शेतकरी बांधवांनी किमान एक देशी गाईचं पालन पोषण करण्याचे आवाहन अण्णासाहेब शेट्टी यांनी केले आहे.









