अंगणातील पत्र्याचे छप्पर जमीनदोस्त ; दुचाकीच्या दर्शनी भागाचाही चक्काचूर
ओटवणे प्रतिनिधी
तांबोळी वरचीवाडी येथील विश्वासराव अमृतराव देसाई यांच्या घरा लगतचा माड कोसळल्याने अंगणातील पत्र्याचे छप्पर जमीनदोस्त झाले तर दुचाकीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. सोमवारी सायंकाळी वादळी पावसात घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेत घराच्या अंगणातील छप्परासह दुचाकीचे सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले.सरपंच वेदिका नाईक यांनी नुकसानीची पाहणी केली.









