मुंबई
मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शिअलचा समभाग हा लवकरच सुचीबद्ध होणार आहे. सदरचा समभाग 21 ऑगस्ट 2023 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सुचीबद्ध होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विलगीकरण नुकतेच करण्यात आले आहे.
मागील आठवड्यात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे समभाग रिलायन्सच्या पात्र भागधारकांच्या डिमॅट खात्यात जमा झाले. विक्रमी तारखेला आरआयएलचे समभागधारकांना 1.1 च्या प्रमाणात जेएफएसएलचे समभाग मिळाले आहेत.
जेएफएसएल समभाग किमत मूल्यांकन
आयोजित विशेष प्री ओपन कॉल लिलाव सत्रात, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या स्क्रिपची किंमत ही प्रती समभाग 261.85 रुपये होती. अशा प्रकारे कंपनीच्या समभागाचे मूल्यांकन हे ब्रोकरेजच्या 190 रुपयांच्या अंदाजापेक्षा जादा राहिल्याची माहिती आहे. अशा प्रकारे एनबीएफसीचे बाजारमूल्य 1.66 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या मूल्यांकासह ती भारतातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी एनबीएफसी कंपनी आहे.









