पीएमआय 60.1 वर : मासिक सर्वेक्षणातून माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील सेवा क्षेत्रातील क्रियाकलाप ऑगस्टमध्ये कमी राहिला, तर नवीन ऑर्डर वाढ उच्च प्रमाणात नोंदली गेली. मासिक सर्वेक्षणात मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे.
सेवा कंपन्यांनी नवीन निर्यात व्यवसायात सर्वाधिक वाढीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे कंपन्यांनी कर्मचारी वर्ग तसेच उत्पादन वाढवण्यास पुढाकार घेण्यात सुरुवात केली आहे. हंगामी समायोजित एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय व्यवसाय क्रियाकलाप निर्देशांक जुलैमध्ये 62.3 वरून ऑगस्टमध्ये 60.1 वर घसरल्याचे दिसून आले आहे.
निर्देशांक सलग 25 व्या महिन्यात 50 च्या वर
पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय), 50 पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे क्रियाकलाप वाढवणे आणि 50 पेक्षा कमी स्कोअर म्हणजे आकुंचन पावणे होय. एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या सहयोगी संचालक पोलीआना डी लिमा म्हणाल्या, ‘भारतीय सेवा कंपन्यांनी ऑगस्टमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली कारण त्यांनी नवीन निर्यात व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ केली.
आशिया पॅसिफिक, युरोप, उत्तर अमेरिका आणि पश्चिम आशियासह अनेक क्षेत्रांनी भरभराटीला हातभार लावला आहे.’









