रत्नागिरी :
राज्य शासनाने नव्याने काढलेल्या शासन निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ४९१ कंत्राटी शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षक नवीन शासकीय धोरणामुळे नाराज झाले आहेत.
या शासन निर्णयानुसार नियुक्ती केलेल्या कंत्राटी शिक्षकांना आता नोकरी गमवावी लागणार आहे. पालकमंत्री सामंत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून या शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे. राज्यातीलं १० व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जि. प. व नगरपरिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे नियमित शिक्षक शाळांवर रुजू होणार असल्याने शिक्षकांना नियुक्ती देण्यात येणार नाही.








