कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याकडून पेडणे नवचेतना संघाचे कौतुक : नाटकाच्या पोस्टरचे अनावरण
पेडणे : सांताव्रुझ कलिना मुंबई येथे होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय वसंत नाट्यामहोत्सवात गोव्यातील विशेषत: पेडणे तालुक्मयातील नवचेतना युवक संघाने निर्मिती केलेल्या ‘सावरबेट’ या नाटकाची निवड होणे ही राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या नाटकात भूमिका साकारणाऱ्या सर्व कलाकारांना तसेच इतर तंत्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. हे नाटक गोव्याच्या नाट्याक्षेत्रासाठी मानाचा तुरा ठरेल, असा विश्वास कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केला. सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सावरबेट’ नाटकाचा प्रयोग वसंत नाट्या महोत्सवात 14 रोजी सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली नवचेतना पदाधिकाऱ्यांनी कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मंत्र्यांच्या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण हस्ते करण्यात आले. यावेळी पेडणे चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस, सावरबेट नाटकाचे प्रमुख कलाकार, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, महादेव गवंडी, कलाकार श्रीनिवास उसगावकर, मनोहर तळवणेकर, पुनीत तळवणेकर, निवृत्ती शिरोडकर उद्देश पेडणेकर आदी उपस्थित होते.
नाट्यासंस्कृती माध्यमातून महाराष्ट्र-गोव्यात मैत्रीचे नाते!
नाट्यासंस्कृतीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोव्याचे मित्रत्वाचे नाते आहे. अनेक गोवेकर आज मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्या सर्व गोवेकरांनी हा नाट्याप्रयोग जरूर पाहावा व कलाकारांना कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन यावेळी मंत्री गावडे यांनी केले. या नाटकाच्या माध्यमातून पेडणे येथील नवचेतना युवक संघाने नाट्याक्षेत्रामध्ये एक मानाचा तुरा खोवला आहे, अशा शब्दांत मंत्री गावडे यांनी नवचेतना संघाचे कौतुक केले.









