Sharad Pawar News : नविन अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी नेमलेल्या समितीची आज बैठक सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच अध्यक्षपदी राहिले पाहिजेत असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी प्रस्तावात मांडला. हा प्रस्ताव सादर होताच निवड समितिने पवारांचा राजीनामा फेटाळला. थोड्याच वेळात राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये बैठकित कोणता निर्णय होईल, काय घोषणा होतील याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले आहे.
शरद पवारच अध्यक्षपदी राहिले पाहिजेत यासाठी राज्यभर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलीस आंदोलकांना शांत कऱण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. शरद पवार यांनी निर्णय बदलावा यासाठी राज्यभर नेत्यांनी राजेनामे दिले आहेत. दुसरीकडे काहांनी रक्ताने पत्र लिहून शरद पवार यांना विणवनी केली आहे. यावर शरद पवार कोणता निर्णय घेतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








