कोल्हापूर प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 नुसार राज्यातील दुर्बल वंचित व अनुसूचित जाती यांच्या कल्याणासाठी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक सुविधा पोहोचवून सदर घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर हे कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व वंचित दुर्बल घटकांच्या विकासामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा मोलाचा वाटा असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील यांनी भेटी प्रसंगी केले.
समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या विविध शैक्षणिक योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना सामाजिक व आर्थिक तसेच शैक्षणिक योजनांची माहिती होण्याकरिता प्रचार प्रसिद्धी कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष, तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फॉर्म भरता यावे याकरिता सुरू करण्यात आलेल्या कॉम्प्युटर लॅबची तसेच तृतीयपंथी नागरिकांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय मध्येच स्वतंत्र शौचालयाची सुविधा याबाबत तसेच कार्यालय मध्ये विविध शासकीय योजनांचे माहिती बाबत बोर्ड प्रसिद्धीपत्रके प्रसिद्धीपत्रके याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यालयास भेट देऊन व कर्तालयातील नाविन्यपूर्ण गोष्टी व सहायक आयुक्त या शासकीय कार्यालयास ISO नामांकन मिळालेले पाहून प्रीतम पाटील यांनी कार्यालयास नावाजले व पुढील कार्यास शुभेच्या दिल्या. या प्रसंगी, सहायक लेखा अधिकारी अरविंद रंगापुरे,कार्यालय अधीक्षक सचिन पाटील तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.









