काजोल, कुब्रा सैत मुख्य भूमिकेत
काजोलची मुख्य भूमिका असलेली सीरिज ‘द ट्रायल’चा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. यात प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींना सामना करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत काजोल आहे. सीरिजमध्sय नोयोनिका सेनगुप्ता या वकिलाची भूमिका ती साकारत असून नवे खटले आणि स्वत:चा पती राजीव सेनगुप्ता (जिशू सेनगुप्ता)सोबत बिघडत्या संबंधांना सावरताना ती दिसून येणार आहे.
दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये काजोल साकारत असलेली व्यक्तिरेखा पतीकडून घटस्फोटाची मागणी करते. यानंतर काजोल एका वकिलाच्या दमदार भूमिकेत दिसून येत आहे. दुसऱ्या सीझनमध्ये पतीसोबतच्या नात्यात अनेक आव्हाने येत असल्याचे दाखविण्यात आले आहे. द ट्रायलचा दुसरा सीझन 19 सप्टेंबर रोजी जियोसिनेमावर स्ट्रीम होणार आहे. उमेश बिष्टकडून दिग्दर्शित आणि बनिजय एशियाकडून निर्मित या सीरिजमध्ये सोनाली कुलकर्णी, शीबा चड्ढा, अली खान, कुब्रा सैत, गौरव पांडे आणि करणवीर शर्मा देखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘द ट्रायल- प्यार कानून धोखा’ ही सीरिज प्रसिद्ध अमेरिकन सीरिज द गुड वाइफचे हिंदी वर्जन आहे.









