नवी दिल्ली
चीनमधील कारनिर्माती कंपनी एमजी मोटर इंडिया लवकरच भारतामध्ये आपला दुसरा प्लांट सुरु करणार असल्याची माहिती मिळते आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतचे सूतोवाच केले जात आहे. सध्याला गुजरातमधील हलोल येथे कंपनीचा निर्मिती कारखाना असून त्याठिकाणी वर्षाला 1,20,000 कार्सची निर्मिती होत असते. उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी दुसरा प्लांट सुरु करण्याची इच्छा असून त्याकरिता 2 ते 3 वर्षे लागू शकतात, असेही कंपनीने म्हटले आहे.









