भोपाळ येथील परिसंवादासाठी गोव्यातील 17 शिक्षकांची निवड
प्रतिनिधी /वाळपई
भारतामधील प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर चांगल्याप्रकारे संशोधन व्हावे व अध्यापनाचे शास्त्र आणखीन प्रभावित होण्याच्या दृष्टिकोनातून भारतातल्या पहिल्याच राष्ट्रीय मूलभूत शिक्षण अभ्यासक्रम प्रशिक्षणामध्ये गोव्यातील 17 शिक्षक भाग घेणार आहेत .सदर शिक्षक नुकतेच भोपाल दौऱयावर निघाले 27 जून ते 1जुलै या दरम्यान एक खास प्रशिक्षण भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये मुलांना कशाप्रकारे शिकविण्यास यावेत अध्यापनाचे शास्त्र व प्राथमिक शिक्षणाचा मंत्र दिला जाणार आहे.
इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱया विद्यार्थ्यांचा जागतिक मूलभूत अभ्यासक्रम शिक्षण यावर हे प्रशिक्षण राहणार आहे .या प्रशिक्षणात गोव्यातील 17 महाराष्ट्रातील 16 कर्नाटकातील 16 तर बिहार मधील 2 शिक्षकांचे निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यातूनही शिक्षक या अभ्यासक्रम प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत. हे प्रशिक्षण शिक्षण मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संचनालय संयुक्त राष्ट्र बालनिधी व अमेरिका इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे.
प्राथमिक विद्यालय शिक्षण घेणारा विद्यार्थी जो अभ्यासक्रम नेमून दिलेला आहे. तो नियमितपणे शिकतो. हा अभ्यासक्रम शिकताना त्यांना जे मूलभूत अभ्यास शिक्षण प्रशिक्षण हवे ते द्यायचे असेल तर ते कशाप्रकारे देता येईल. प्राथमिक विद्यालयांनी शिकणारा विद्यार्थी हा जागतिक स्तरावर साधारण पातळीवरून मध्यम पातळीवरून व मध्यमावरून तो सुधारित पातळीवर कसा जाईल याची कारणे शोधणे यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.
यासाठी कोणत्या प्रकारचे उपाय निश्चित करावे यावरही प्रशिक्षणामध्ये खास चर्चा केली जाणार आहे. या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रशिक्षणामध्ये गोव्याचे समन्वयक गजानन देसाई निपून भारत ,उदय सावंत, निपूण भारत ,गोपीनाथ गावस हे कोकणी समन्वयक व शिक्षक कविता सतीश परब ,अनिता फर्ना?डिस ,पूजा शारदा कांदोळकर ,अस्मिता रुपेश गवस, प्रमिला गावकर ,राहुल पोळेकर, सुनील पि. के, दर्शना वेर्णेकर, रूपाली रामा गावस देसाई मिलन नार्वेकर दामोदर गावकर व नूतन सुरेंद्र मळीक शिक्षक सहभागी झाले आहेत.
देशाच्या विविध राज्यांनी अधिकतर विद्यार्थी हे ग्रामीण स्वरूपात राहणारे आहेत? ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळय़ा प्रकारचे असतात. त्यांच्या अडचणी वेगळे आहेत .मूलभूत अभ्यास शिक्षण त्यांच्यापर्यंत कसे जाईल हे मूलभूत शिक्षण वाचन बोलणे व लेखन या आधारावर अवलंबून असेल. मूलभूत शिक्षण या विद्यार्थ्या पर्यंत कसे जाईल त्याचा लाभ कसा होईल या संदर्भात या प्रशिक्षणामध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.









