दोडामार्ग – वार्ताहर
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना २०२३-२४ अंतर्गत शाळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता जिल्हास्तरावर परसबाग लागवड स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
परसबागेत वांगी, दोडगी, भेंडी, काकडी, वाल, भोपळा अशा भाज्या तर पपई, पेरु, चिकु, केळी अशी फळ झाडे लावण्यात आली. यावर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्याच औचित्य साधुन मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांच्या संकल्पनेतुन प्रशालेच्या आवारात नाचणी पिकाची लागवड करण्यात आली. या कामी विद्यार्थी, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. परसबागेच परीक्षण तालुका गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, केंद्र प्रमुख गुरुदास कुबल व श्री. पावरा, श्री. नाईक यांनी केले. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, पिकुळे ग्रामस्थ मंडळ हितवर्धक मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, पिकुळे ग्रामस्थ यांनी प्रशालेचे अभिनंदन केले.









