चिपळूण :
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले लोकाभिमुख काम, राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. मतदारसंघात मुलभूत सोयी-सुविधांसह आरोग्य, क्रीडा, पर्यटन, शैक्षणिक, औद्योगिकसह विविध क्षेत्रात काम करून मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर समृध्द मतदारसंघ करण्याच्यादृष्टीने आम्ही सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मतदारसंघातील जनता परिवर्तन घडवण्यासाठी आमच्या पाठीशी आहे. यासाठी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शृंगारतळी येथील पाटपन्हाळे स्पष्ट हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.








